जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कंटेनर रिव्हर्स घेतांना अंदाज न आल्याने डीपीला वाहन धडकून विजेच्या धक्क्याने चालकाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या संदर्भातील माहिती अशी की, शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाहेरील बाजूला आरजे ०९ जीसी २५९७ या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने आज गाडी रिव्हर्समध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज आला नाही. यामुळे कंटेनर सरळ डीपीवर आदळले. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर परिसरातील लोकांनी घाव घेऊन सावधगिरीने चालकाचा मृतदेह कॅबिनच्या बाहेर काढला. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून संबंधीत चालकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पंचनामा सुरू होता.