अरेच्चा. . .कलेक्टर आयुष प्रसाद यांची घंटागाडीत सवारी : बनले स्वच्छतादूत !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे स्वच्छता मोहिमेत थेट घंटागाडीत सवारी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तर त्यांनी सोबतच स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जामनेर येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी शहरामध्ये स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत स्वत: सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कर्मचार्‍यासोबत स्वतः साफसफाई केली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयुष प्रसाद यांनी स्वत: कचरा संकलन करणार्‍या घंटागाडीत बसून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. थेट कलेक्टरांनाच घंटागाडीत बसलेले पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांनी घंटागाडी मध्ये बसून जामनेर शहरांमधील स्वच्छतेची पाहणी केली.

आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे हे गतीमान आणि सुटसुटीत केली आहेत. यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळालेली आहे. एकीकडे कार्यालयीन कामांमध्ये सुधारणा करतांनाच त्यांनी ठिकठिकाणच्या भेटीतून आपला ऍक्शन मोड दाखवून दिला आहे. अलीकडेच रावेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना स्वत: मैदानावर उतरून मोठा दिलासा दिला होता. यानंतर त्यांनी आज जामनेर येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन प्रशासन हे किती चांगल्या प्रकारे लोकाभिमुख प्रकारे काम करू शकते हे दाखवून दिले आहे.

हे देखील वाचा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना चार पिढ्यांचा प्रशासकीय वारसा !

दरम्यान, आजच्या जामनेर दौर्‍यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिका व अधिकार्‍यांना स्वच्छतेबाबत विविध प्रकारच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता मोहिमेत त्यांनी स्वत: सहभागी होत कचरा संकल्न केले. जामनेर शहरातील नगरपालिका स्वच्छ व सुंदर होऊन देशांमध्ये राष्ट्रपती यांच्या असे दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी आपण प्रयत्न करावा असे आव्हाने केले असून यावेळी जामनेर तहसील कार्यालयामध्ये विविध अधिकार्‍याची बैठका घेऊन जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन जलयुक्त शिवार योजनेतील गावे गाळमुक्त धरण व जलजीवन मिशनची कामे पूर्ण करा व शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे कायमस्वरूपी त्यांना जागा द्यावे कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीतील दिले.

यावेळी प्रांत अधिकारी महेश सुधाळकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी माजी नगरसेवक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हा व्हिडीओ नक्की पहा : आपत्ती जनतेवर. . .कलेक्टर ‘ग्राऊंड झीरो’ वर !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2006251149738232

Protected Content