जळगाव बसस्थानकातून महिलेची पोत लांबवली

download 6 1

जळगाव प्रतिनिधी । धार्मिक कार्यक्रम आटोपून जळगाव-भुसावळ बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेल्याची घटना शहरातील नवीन बसस्थानकात सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. अर्धी मंगलपोत साडीच्या जवळच पडल्याने मंगलपोत चोरीची घटना लक्षात आली. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

याबबात माहिती अशी की, रत्ना हेमराज तळेले (वय-52) रा. सातोद ता. यावल ह्या जळगाव येथे धार्मिक कार्यासाठी गावातील काही महिलांसोबत आल्या होत्या. धार्मिक कार्य आटोपून पुन्हा यावल जाण्यासाठी जळगाव भुसावळ या बसमध्ये सकाळी 11 वाजता चढत असतांना अज्ञात महिलांनी धक्का देवून गळ्यातील चार ग्रॅम सोन्याची पोत आढून चोरून नेली. बसमध्ये चढल्यावर मंगलपोतचा काही भाग तुटून त्यांच्या साडीजवळ पडल्याने पोत चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच बसमधून उतरून वाहकाला घटनेची माहिती बसस्थानकातील पोलीसांना कळविले. अद्यापपर्यंत सोन्याची चैन चोरी प्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content