जळगाव, प्रतिनिधी । आज पहाटे बीएचआर घोटाळ्यात अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे यांची प्राथमिक चौकशी करून पुणे येथील आर्थिक गुन्हा शाखेचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज पहाटे अटकसत्र झाले. यात पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व राजेश लोढा यांना अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
यात व्यावसायिक भागवत भंगाळे यांचा समावेश आहे. सुमारे तीन तास चौकशी झाल्यानंतर भागवत भंगाळे यांना त्यांच्या घरी नेण्यात आले. येथे पथकाने कसून चौकशी केली. येथे देखील सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हापेठ पोलीस स्थानकात चौकशीसाठी नेले आहे. यानंतर सुमारे पावणेदोन वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना झाले. पुणे येथे जाण्यासाठीचा वेळ गृहीत धरला तर भंगाळे यांना उद्या पुणे येथील न्यायालयात सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.