जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १७ वर्षे वयोगटाच्या आतील राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत जळगावच्या भाग्यश्री पाटीलने चौथ्यांदा राष्ट्रीय विजेतेपद पटकावत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
ओडिशाची राजधानी भवनेश्वर शहरात नुकतीच बुध्दीबळाची १७ वर्षाखालील वयोगटाची राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. यात देशभरातून ५६ खेळाडू सहभागी झाले होते. यात जळगावच्या भाग्यश्री पाटीलने चौथ्यांदा राष्ट्रीय विजेती होण्याचा मान मिळवला.
यामुळे तिला आशियाई व जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. भाग्यश्रीच्या या विक्रमी यशाबद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, विनय बेले, सुनील शर्मा, नरेंद्र फिरोदिया, यशवंत बापट, संजय वाघ, शंभू पाटील यांनी कौतुक केले आहे.