जळगाव प्रतिनिधी | सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणीसव्या वर्धापनदिनामित्त येत्या ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी जळगावी दोन दिवसीय पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देतांना सतीश जैन मह्णाले की, कांताई सभागृहात हे संमेलन पद्मश्री डॉ. भवरलाल जैन सभागृहात प्रा. पुरुषोत्तम पाटील व्यासपीठावर, त्र्यंबक सपकाळे साहित्य नगरी, काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणीस प्रवेशद्वारात रंगणार आहे. ८ जानेवारी रोजी दुसर्या सत्रात ङ्गमानवतावादी विचारांची प्रस्थापना करणारे साहित्य : दलित साहित्यफ या विषयावर परिसंवाद प्रा. डॉ. म. सु. पगारे (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. डॉ संजीवकुमार सोनवणे (धरणगाव), प्रा. सत्यजित साळवे (जळगाव), जयसिंग वाघ (जळगाव हे सहभागी होतील. लेखिका प्रा. डॉ. मथू सावंत (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार आहे. त्यात रामदास वाघ (कापडणे, जि. धुळे), प्रा. डॉ. संजीव गिरासे (धुळे), सप्तश्री माळी (नाशिक) हे सहभागी होतील. चौथ्या सत्रात ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य : परस्पर संबंध या विषयावर प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यात सुमन मुठे (नाशिक), राजेंद्र भोसले (सोलापूर), डॉ. सविता पटेल (नंदुरबार) हे सहभागी होतील.
थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या स्मृती पाचव्या सत्रात कवी प्रा. डॉ. पी विठ्ठल (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात अनिल शिंदे, प्रा. संध्या महाजन (जळगाव), विलास मोरे (एरंडोल), एकनाथ आव्हाड (मुंबई) हे थोरांच्या स्मृती जागवतील. कला आणि स्वातंत्र्य या विषयावर समीक्षक चंद्रकांत चव्हाण (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या सत्रात हा परिसंवाद होईल. त्यात प्रा. सुधीर त्रिभुवन (नवापूर), प्रा. डॉ. रजनी लुंगसे (शिरपूर), हबीब भंडारे (औरंगाबाद), डॉ. विशाल इंगोले (लोणार) हे सहभागी होतील. अकराव्या सत्रात ङ्गखान्देशातील समृद्ध संत परंपरा व साहित्यफ या विषयावर परिसंवाद प्रा. डॉ. म. रा. जोशी (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात प्रा. सी. एस. पाटील (धरणगाव), डॉ. विनोद गोरवाडकर (मालेगाव), प्रा. रामकृष्णा पाटील (जामनेर) हे सहभागी होतील.
यासोबत साहित्यात खान्देशचे योगदान विषयावर परिसंवाद ९ जानेवारी २०२२ रोजी नवव्या सत्रात साहित्यात खान्देशचे योगदान या विषयावर परिसंवाद कवी अशोक नीलकंठ सोनवणे (चोपडा) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. डॉ. मिलिंद बागुल (जळगाव), प्रा. डॉ. तुषार चांदवडकर (नाशिक), अशोक कोळी (जामनेर) हे सहभागी होतील. साहित्यात खान्देशचे योगदान विषयावर परिसंवाद ९ जानेवारी २०२२ रोजी नवव्या सत्रात साहित्यात खान्देशचे योगदानफ या विषयावर परिसंवाद कवी अशोक नीलकंठ सोनवणे (चोपडा) यांच्या अध्यक्षतेखाली होईल. डॉ. मिलिंद बागुल (जळगाव), प्रा. डॉ. तुषार चांदवडकर (नाशिक), अशोक कोळी (जामनेर) हे सहभागी होतील अशी माहिती सतीश जैन यांनी दिली.