जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांच्या कॅबिन समोर आज विद्यापीठ कृती समितीच्या कर्मचार्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांची नियुक्ती बेकायदेशीर पध्दतीत करण्यात आली असून त्यांना कार्यमुक्त करावे या मागणीसाठी विद्यापीठ कृती समितीने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाच्या तिसर्या दिवशी कर्मचार्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. कृती समितीच्या सर्व सदस्यांनी प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांच्या कॅबिनला घेराव घातला असून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
दरम्यान, कर्मचार्यांनी डॉ. पवार यांच्या कॅबिनचा विद्युतर पुरवठा खंडीत केला असून जोरदार घोषणाबाजीला प्रारंभ केला आहे. डॉ. भादलीकर यांच्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणी करत विद्यापीठ कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आता पुढे काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.