जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एसीबीची कारवाई ! : कर्मचारी अटकेत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्‍यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

्रअँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचून लिपीक नारायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

या अनुषंगांने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे या कर्मचार्‍याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

Protected Content