जळगाव, प्रतिनिधी | पूज्य मोक्षरक्षीत व प्रभुरक्षीत विजयजी महाराज यांच्या दिक्षेस पंचवीस वर्ष पुर्ण झाल्याप्रित्यर्थ भक्तांतर्फे महापूजन आयोजित होते. यानिमित्त गोळा झालेल्या रक्कमेतून जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक मंदिरातर्फे देवगिरि कल्याण आश्रमच्या अमळनेर, वावडदा, कनाडी (शहादा), अक्कलकुआ अशा चार विद्यालयात पाच महिन्यांसाठीचे धान्य वितरीत करण्यात आले.
जैन संघाचे दिलीप गांधी यांनी सहका-यांच्या मदतीने हा अभिनव कार्यक्रम घडवून आणला. धान्यामध्ये एक हजार २०० किलो गहु, ३२० किलो तांदूळ, १२० किलो तेल, १६० किलो चनाडाळ, १६० किलो उडिदडाळ, १६० किलो मुंगडाळ, १६० किलो तुरडाळ, ८० किलो पोहा , ६० किलो रवा, ४० किलो गुळ, असे देण्यात आले आहे. मोक्षरक्षीत महाराजांनी अन्नदानाचे महत्व पटवून देत कार्याचे कौतूक केले. यावेळी महामंत्र म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. कार्यक्रमात सूमतिलाल टाटिया, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, नयन शाह, दिपक निबजीया, नीलिमा सेठिया, प्रकाश सेठिया, विनोद राका, किरण निबजीया, अंजली कुलकर्णी, डॉ. रितेश पाटील, किशोर पाटील, वैशाली कु-हाडे, उमेश घुसलकर, भुषण आग्रे, इत्यादी उपस्थित होते.