एरंडोलमधून महायुतीचे उमेदवार चिमणराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

chimanrav arj

एरंडोल, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार चिमणराव पाटील यांनी आज (दि.४) आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याकडे सादर केला.

 

त्याआधी गावातून त्यांनी फेरी काढुन महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले. यानंतर दुपारी १२ नंतर त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्क पमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, सदाशिव ढवळे, नगराध्यक्ष रमेश परदेशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, किशोर निंबाळकर, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते. त्या आधी शिवसेनेचे राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी सभाही घेतली.

Protected Content