जळगावात आंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन (व्हिडीओ)

jelbharo aandolan 1

जळगाव, प्रतिनिधी | ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे आज (दि.१४) आंगणवाडी व आशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीच्या मोर्च्याचे आयोजन येथील जी.एस. मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आले होते. तेथे जावून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

 

अधिक माहिती अशी की, मानधन व पगार वाढीची आश्वासने देवूनही सरकारने प्रत्यक्षात काहीच कार्यवाही न केल्याने तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पगारही न मिळाल्याने दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून आज हे आंदोलन केले. हे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या २२ जुलैपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने आंगणवाडी व आशा कर्मचारी तसेच ‘आयटक’चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Protected Content