पिंप्राळा शिवारात अज्ञात चोरट्यांकडून दोन मोबाईलसह रोख रक्कम लंपास

pinprala

जळगाव प्रतिनिधी | येथील पिंप्राळा शिवारातील एका घरात दोन जण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरातून दोन मोबाईल आणि 8 हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, निखिल वसंत महाले (26) रा. कोरपावली ता यावल, ह.मु. सेंट्रल बँक कॉलोनी, पिंप्राळा शिवार आणि मित्र अनिल पंडितराव चोपडे सोबत भाड्याच्या खोलीत राहतात. दोघे खाजगी नोकरीला आहे. रात्री 12.30 वाजता जेवण करुन दरवाजा उघडा ठेवत झोपी गेले. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातून 2 मोबाईल, कपडे, कपड्यांची बॅग आणि 8 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. परंतू, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले कपडे आणि कपड्यांची बॅग हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदिराजवळ फेकून दिले, ही बाब सकाळी 6 वाजेच्या सुमारास महाले आणि चोपडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस स्टेशन या घटनेबाबत माहिती दिली. दुपारी उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content