माजी आ.जगदीश वळवी यांनी घेतली पिडीत मुलींची भेट

jagadish valavi

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वैजापूर येथे दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची दुदैवी घटना दि. 13 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती मिळताच, माजी आ. जगदीश वळवी यांनी आज शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्या पिडीत मुलींची भेट घेतली. तसेच आर्थिक मदतीची गरज असल्याच मला कळवा, मी स्वत: सर्व खर्च करेल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, माजी आ.जगदीश वळवी पुढे म्हणाले की, ही घटना मानवतेला काळीमा फ़ासणारी असून, मानवमन सुन्न करणारी आहे. अशा वेदनादायी शब्दात भावना व्यक्त केला. तसेच यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, डॉ.पंकज पाटील, स्रीरोग तज्ञ डॉ.पवन पाटील यांच्याशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. या घटनेतील नराधम आरोपीला कायदयाने कठोर शिक्षा मिळावी म्हणून आपण स्वतः संबधित अधिकारी वर्गाशी बोलू असे त्यांनी सांगितले. तसेच पीडीत परिवार व डॉ.यांच्याशी बोलतांना सूचना केली की, पीडीत मुलींच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार त्यांना कुठे इतर हॉस्पिटलला दाखल करायाचे असेल, अथवा बाहेरचे तज्ञ डॉक्टर बोलवायचे असतील, व बाहेरुन काही औषधी वगैरे मागवायच्या असतील तर मला सांगा. मी स्वतः सर्व खर्च करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Protected Content