जय माता दी : यंदा वैष्णोदेवीला विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी !

जम्मू-वृत्तसेवा | तब्बल एक दशकानंतर वैष्णोदेवी यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली असून यंदा भाविकांच्या संख्येचा विक्रम होईल असे दिसून येत आहे.

वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या संदर्भात माहिती देतांना अधिकार्‍यांनी सांगितले की, सोमवारपर्यंत एकूण ९३.५० लाख लोकांनी मंदिराला भेट दिली. जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावर असलेल्या वैष्णो देवी मंदिरात लाखो लोकांनी भेट दिली. यापूर्वी २०१३ मध्ये ९३.२४ लाख लोकांनी भेट दिली होती. यंदा यापेक्षा जास्त भाविक येणार असून यातून नवीन विक्रम प्रस्थापित होणार आहे.

दरम्यान, श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग म्हणाले, यात्रेकरूंच्या नवीन विक्रमासह गेल्या दहा वर्षांतील तीर्थयात्रा सर्वाधिक आहे. यात्रेच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या २०१२ मध्ये होती, जेव्हा १,०४,०९,५६९ यात्रेकरू आले होते. त्यानंतर २०११ मध्ये १,०१,१५,६४७ भाविक होते. यंदा याचा विक्रम मुडणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

अलीकडे मंदिरात सुविधांच्या बाबतीत काही सुधारणा झाल्या आहेत. ज्यामध्ये माता वैष्णो देवी भवन आणि दुर्गा भवनमधील स्कायवॉकचाही समावेश आहे. ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्कायवॉक आणि नूतनीकरण केलेल्या पार्वती भवनाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय कटरा येथील तीर्थक्षेत्र बेस कॅम्प हे अत्याधुनिक कॉल सेंटर बनले आहे. यात्रेकरूंना येथे २४ तास मदत केली जाते. तर, ऑक्टोबरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी माता वैष्णो देवी भक्तांसाठी ’लाइव्ह दर्शन’ सुविधा सुरू केली होती. याचा देखील भाविकांना लाभ होत आहे.

Protected Content