यावल प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रोझादा येथील मूळ रहिवाशी आणि सध्या फैजपूर येथे राहत असलेले जगदीश धांडे यांची कॉंग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जगदीश धांडे यांची प्रदेशाध्यक्ष अॅड. सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे.
सदर निवडीबाबत त्यांचे राज्याचे आदिवासी मंत्री तथा संपर्कमंत्री जळगाव जिल्हा ना. अॅड. के. सी. पाडवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आ.शिरीषदादा चौधरी, आ. रमेश चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब पाटील, राजीव पाटील, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे कपिल सुर्यवंशी, शुभम शिंदे, प्रदीप डाकरे, गौरव चौहान, संदीप माळी, उमेश कुट्ट शेट्टी, रावेर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेशवर महाजन, नगराध्यक्ष दारासेठ मोहम्मद, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, नितीन चौधरी, यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, युनूस पिंजारी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा मनीषा पाचपोळे, नगरसेवक आसिफ, नगरसेवक केतन किरंगे देवेंद्र बेंडाळे, भरतभाऊ महाजन, कदिर खान, सद्दाम शाह, चंद्रकला इंगळे, कलिम भाई, भुपेश जाधव, मीनाक्षी जावरे, देवेंद्र फेगडे, रामराव मोरे, नईम भाई, तौफिक भाई आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.