गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘जागतिक रक्‍तदाता’ दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये १४ जून हा जागतिक रक्‍तदाता दिवस आज सोमवारी सकाळी ११ वाजता साजरा करण्यात आला. रक्‍तदान करत दुसर्‍याचे प्राण वाचविण्यासाठी जो मदत करतो तोच खरा हिरो असतो, असा सूर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांकडून निघाला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रागंणात सुबक रांगोळीद्वारे अकरा प्रकारातील रक्‍तगट आणि त्याचे आदान प्रदान होते ते मांडण्याचा प्रयत्न केला होता. 

यावेळी ओबीजीवाय विभातील प्रा. स्नेहा इखार यांनी सांगितले की, रक्‍तदान करण्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षी १४ जून रोजी रक्‍तदाता दिवस साजरा केला जातो. रक्‍तदानाविषयी अनेकांच्या मनात गैरसमज असतो, मात्र असं काही नाही. रक्‍तदान केल्याने ९० दिवसात शरिरात लाल रक्‍तपेशी तयार होतात त्यामुळे शरिरावर परिणाम होत नाही, फक्‍त सकस आणि पूरक आहार घ्यावा, व्यायाम करायला हवा. जे व्यक्‍ती सक्षम आहे त्यांनी आवर्जुन रक्‍तदान करावे, असे आवाहन इखार यांनी केले.

प्रा.जसनिथ दाया ह्यांनी सांगितले की, रक्‍तदानाद्वारे आपण दुसर्‍याचा जीव वाचवू शकतो, त्यामुळे रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कुठल्याही सशक्‍त व्यक्‍तीने रक्‍तदान केले तर त्याला नुकसान होत नसून उलट त्याची प्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदतच होते असे प्रा.दाया यांनी सांगितले.  यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकवृंद उपस्थीत होते.

https://fb.watch/67iJuHMuRv/

Protected Content