भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वंचित बहूजन आघाडीने विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भुसावळातून संविधान बचाव आमचे संस्थापक अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने आधी जिल्ह्यातून रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पक्षाकडून अन्य ठिकाणी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती.
अखेर आज संविधान आमचे संस्थापक अध्यक्ष आंदोलन सम्राट जगनभाई सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पक्षाने सोळा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात त्यांच्या नावाचा समावेश आहे.
भुसावळमधून आधीच भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने अद्यापही उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. यातच आता जगनभाई हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते आघाडीच्या माध्यमातून लढले होते. ते आता वंचितकडून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.