भुसावळ प्रतिनिधी । येथील विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीतील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत जगन सोनवणे यांनी आज (दि.४) शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
भुसावळच्या नागरिकांनी अनेकांना संधी दिली, मलाही एकदा संधी देऊन अनुभव घ्यावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे. तसेच अनेक वर्षापासून शहर विकासापासून वंचित आहे, विकास कामे प्रलंबित आहेत, अशा कामांना निश्चितपणे न्याय देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
पहा : जगन सोनवणे यावेळी काय म्हणाले