जगदीश वळवी यांच्या संपर्क अभियानास प्रारंभ

jagdish valvi campaign
चोपडा प्रतिनिधी । येथील माजी आमदार जगदीश वळवी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, विधानसभा मतदारसंघात आपले संपर्क अभियान सुरू केले आहे.

चोपडा तालुका विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार तथा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जगदीश वळवी यांनी रविवारी आदिवासी तडवी समाजाच्या आग्रहानुसार यावल तालुक्यातील चोपडा विधानसभा मतदार संघातील किनगाव व नायगाव या गावांना सदिच्छा भेटी दिल्यात. याप्रसंगी तडवी समाजाचा एकही उमेदवार उभा राहणार नसून उभा राहिला तर समाज त्याच्या पाठीशी उभा राहणार नसल्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी जगदीश वळवी हे आमदार असतांना आदिवासी समाजाला मिळालेल्या विविध सुविधा जसे खावटी, घरकुल , शासकीय योजनांचा लाभ तडवी समाजाला मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली.

याप्रसंगी बोलतांना माजी आमदार जगदीश वळवी यांनी सांगितले की आपल्या आदिवासी समाजाचे मतदान २७% म्हणजे जवळपास ८० हजार मतदान आहे. पण त्यात भिल्ल, पारधी, तडवी, बारेला , पावरा अशी विभागणी आह. मात्र फोडा आणि राज्य करा या नितीनुसार कुणीही उभा राहतो. त्यामुळे समाजाचा माणूस पराभूत होतो, मागच्या वेळी झालेली चूक सुधरवायची असेल आणि समाजाला न्याय् मिळवून द्यायचा असेल तर फक्त तडवी समाजानेच नव्हे इतर बारा बलुतेदार समाजानेही विचार केला पाहिजे. आणि यासोबत सर्वात महत्वाचा घटक त्यात माझा मराठा, गुजर व इतर समाज आहे. त्यांचा मला नेहमीच अभिमान गर्व आहे. हा समाज सधन, सुशीक्षित, निगर्वी आणि भविष्याचा विचार करणारा समाज आहे. या सर्व समाजाचे मला नेहमी पाठबळ राहिले आहे आणि पुढेही राहिल असा विश्‍वास आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, रज्जाक तडवी, राजू तडवी, लुकमान तडवी, शफी तडवी, राशिद तडवी, लतीफ तडवी, सिराज तडवी, शकूर तडवी, अमीन तडवी, बबलू तडवी, रुबाब तडवी, नजर तडवी, इतबार तडवी, वजीर तडवी, कदीर तडवी यांच्या सह पत्रकार शाम जाधव हजर होते .

Protected Content