जे.टी. महाजन अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याची नामांकीत कंपन्यांमध्ये निवड

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागातर्फे कँपस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नामांकीत कंपन्यांतर्फे निवड करण्यात आली असून ते सेवेवर रूजू झाले आहेत.

जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर हे कॉलेज अद्ययावत सुविधा व दर्जेदार शिक्षणासाठी ख्यात आहे. येथील विद्यार्थ्यांना आधुनीक युगाशी सुसंगत असणारे शिक्षण प्रदान करण्यात येत आहे. याच्या जोडीला त्यांच्यासाठी अद्ययावत प्रयोगाळादेखील असून यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रॅक्टीकलमध्येही पारंगत होता येते. याच्या जोडीला संस्थेतर्फे प्लेसमेंट सेल देखील कार्यरत असून याच्या माध्यमातून पसिरसर मुलाखतींचे (कँपस इंटरव्ह्यू) नियमितपणे आयोजन करण्यात येते. यात ख्यातप्राप्त कंपन्यांचे अधिकारी शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कंपन्यांमध्ये निवडत असतात.

या अनुषंगाने जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्युनिकेशन विभागातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यात प्रामुख्याने हिमानी प्रमोद बोंडे हीची सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून सायबेज सॉफ्टवेअर, पुणे येथे निवड झाली आहे. दिशा डिगंबर चौधरी ही सिनिअर प्रोसेस एक्झेकेटिव्ह म्हणून इन्फोसीस या जगविख्यात कंपनीच्या पुणे ऑफिसमध्ये रूजू झाली आहे. कल्याणी राजेंद्र झोपे ही एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून हेपोट्रेस टेक्नॉलॉजी, पुणे येथे रूजू झाली आहे. तनुजा चंद्रकांत झोपे ही प्रोसेस  एक्झेकेटिव्ह या पदावर एनव्हीआयडिआयए पुणे येथे जॉईन जालेली आहे. प्रियंका विजयसिंग सिसोदे हिला सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून सायबेज सॉफ्टवेअर, पुणे येथे संधी मिळाली आहे. मयुर राजु चौधरी याची एक्झेकेटिव्ह डेव्हलपर म्हणून अंधेरी मुंबई येथील क्लोव्हर इन्फोटेक कंपनीने निवड केली आहे. तुषार गणेश राणे हा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून एल एस स्पेक्ट्रम सोल्युशन, मुंबई येथे रूजू झाला आहे. तर पंकज युवराज चौधरी याला कस्टमर सपोर्ट इंजिनीअर म्हणून टाटा नेल्को, नवीन मुंबई  येथे संधी मिळाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ आर डी पाटील, विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए एम पाटील, ट्रेनिंग  ऍंड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ जी ई चौधरी, ऍकॅडमीक डिन प्रा. डॉ पी एम महाजन यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

सध्या कोरोनाचे सावट पूर्णपणे नाहिसे झालेले नाही. यामुळे अनेक ठिकाणी रोजगारांच्या संधींमध्ये कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, दर्जेदार शिक्षणामुळे जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांना यंदा देखील करियरची चांगली संधी मिळाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कँपस इंटरव्ह्यू सोबत बहुतांश विद्यार्थी हे विविध कंपन्यांमध्ये रूजू झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची दर्जेदार व प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड होऊन त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक पॅकेज मिळाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद महाजन, सर्व संचालक,प्राचार्य डॉ एन. डी. नारखेडे,सर्व विभाग प्रमुख,डीन अकेडेमिक डॉ पी. एम. महाजन,प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ जी. इ. चौधरी व सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

या संदर्भात बोलतांना संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन म्हणाले की, उच्च व रोजगाराभिमुख शिक्षण ही जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजची गौरवशाली परंपरा आहे. आमच्या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी हे जगभरात आज विविध पदांवर कार्यरत आहेत. हा वारसा कायम चालविण्यासाठी संचालक मंडळासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. यंदाची प्रवेश प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा शरद महाजन यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!