फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकीत कंपन्यांमध्ये निवड आली असून ते सेवेवर रूजू आहेत. या माध्यमातून कॉलेजने आपल्या प्लेसमेंटमधील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर हे कॉलेज अद्ययावत सुविधा व दर्जेदार शिक्षणासाठी ख्यात आहे. येथील विद्यार्थ्यांना आधुनीक युगाशी सुसंगत असणारे शिक्षण प्रदान करण्यात येत आहे. याच्या जोडीला त्यांच्यासाठी अद्ययावत प्रयोगाळादेखील असून यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रॅक्टीकलमध्येही पारंगत होता येते. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे येथील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट शाखेमार्फत नियमीतपणे ख्यातनाम कंपन्यांमध्ये निवड होत असते.
या अनुषंगाने जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ आर डी पाटील, विभाग प्रमुख प्रा. डी. ए वारके, ट्रेनिंग ऍंड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ जी ई चौधरी, ऍकॅडमीक डीन प्रा. डॉ पी. एम. महाजन यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
सध्या कोरोनाचे सावट पूर्णपणे नाहिसे झालेले नाही. यामुळे अनेक ठिकाणी रोजगारांच्या संधींमध्ये कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, दर्जेदार शिक्षणामुळे जे.टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करियरची चांगली संधी मिळाली आहे. अनेक विद्यार्थी नामांकित व प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कार्यरत असून त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक पॅकेज मिळाले आहे.
यात प्रामुख्याने केतन चौधरी हे झेड एस असोसिएट्स, पुणे; दुर्वेश बढे हे कॅपजेमिनी; समीर ढाके,द रॉयल इंजिनिअर प्रा लि चाकण; गौरव बर्हाटे, ग्लोबल क्लाउड एक्सचेंज; प्रसाद मराठे,फाउंडेशन ब्रेक मनुफॅक्चअरिंग,जळगाव; चिराग पाटील हे शुभदा पोलीमर्स,नाशिक या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद महाजन, सर्व संचालक,प्राचार्य डॉ एन. डी. नारखेडे,सर्व विभाग प्रमुख,डीन अकेडेमिक डॉ पी. एम. महाजन,प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ जी. इ. चौधरी व सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.
या संदर्भात बोलतांना संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन म्हणाले की, उच्च व रोजगाराभिमुख शिक्षण ही जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजची गौरवशाली परंपरा आहे. आमच्या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी हे जगभरात आज विविध पदांवर कार्यरत आहेत. हा वारसा कायम चालविण्यासाठी संचालक मंडळासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. यंदाची प्रवेश प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा शरद महाजन यांनी केले आहे.