जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम!

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या मूल्याधिष्ठित आणि कृतीयुक्त शिक्षणावर भर देणारी जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलने यंदाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. शाळेतील शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

यावर्षी शाळेतील विद्यार्थिनी यज्ञा अतुल पाटील हिने ९६.६०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर जिज्ञासा निलेश ढाके हिने ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान प्राप्त केले. गितेश मनोहर नेहते याने ९४.४०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण ७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. ३६ विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. उर्वरित २ विद्यार्थी ७४.४० गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या शानदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, उपाध्यक्ष मार्तंड गणपत भिरूड, सचिव विजय झोपे, सहसचिव सोनू भंगाळे आणि संस्थेच्या सर्व संचालक मंडळ तसेच इतर सदस्य व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षिका पुनम नेहेते आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या उत्कृष्ट निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Protected Content