लढाई विचारांची हवी, यासाठी हात उगारणे अयोग्य ! : खडसे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधीमंडळाच्या बाहेर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या राड्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, विधिमंडळाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये वाद झाले. यात शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले.

यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हावे असे ते म्हणाले. तसेच आज झालेला प्रकार हा गैर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Protected Content