दोन वर्षाच्या चिमुकलीच्या अत्याचार विरोधात भाजप महानगरतर्फे निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । धुळे तालुक्यातील निमगुळे येथील दोन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करावी अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी महानगरच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील निमगुळे येथील दोन वर्षाच्या चिमुकलीवर गावातील रहिवाशी प्रवीण रामराव माली (सैंदाणे) याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून अमानुषपणे खून करून विहीरीत फेकून दिले. या घटनेचा जळगाव भाजप महानगरच्या वतीने निषेध व्यक्त करत आहे. चिमुकलीला मारणाऱ्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करावी, जलद न्यायालयात खटला सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर महापौर भारती सोनवणे, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, उपाध्यक्षा सरिता नेरकर, सरचिटणीस रेखा वर्मा, नितू परदेशी, नगरसेविका पार्वता भिल यांच्यासह महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होत्या.

Protected Content