थकीत रजा रोखीचा प्रश्न मार्गी; मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेतील जुन्या पेन्शनधारकांच्या रजा रोखीचे पैसे गेल्या दहा वर्षांपासून थकित होते. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे थकीत पैसे आता कर्मचाऱ्यांच्या हाती आले आहेत. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल जुन्या पेन्शनधारकांनी आणि इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामनिवास झवर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

या सत्कार समारंभावेळी जुने पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच इंटकचे शहराध्यक्ष चेतन वाघरे, युवराज ताडेराव, चंदन बिवाल, गोपी पचेरवाल आणि नगरपालिकेतील इतर कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. दहा वर्षांपासून रखडलेले आपले हक्काचे पैसे मिळाल्याने पेन्शनधारकांनी समाधान व्यक्त केले आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Protected Content