पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आता इराणही करणार कारवाई

1397121208190162116795824

तेहरान (वृत्तसंस्था) पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानस्थित ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे अड्डे भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केल्यानंतर आता इराणनेही दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईची धमकी देत थेट ‘युद्ध’ पुकारले आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानचेही इराण सरकार आणि तेथील लष्कराने कान उपटले आहेत.

 

इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) कोड्स फोर्सचे जनरल कासीम सोलेमनी यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. याशिवाय दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तानचं सरकार आणि लष्करालाही जाब विचारला आहे. ‘तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात?’ सीमेवर आणि शेजारी देशांमधील अशांततेला तुम्हीच कारणीभूत आहात’, असा थेट आरोपच जनरल कासीम यांनी केला आहे. तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे. तरीही तुमच्या देशात कार्यरत दहशतवादी संघटनांचा तुम्ही नायनाट का करू शकला नाहीत ? असा सवाल करत पाकिस्ताननं इराणच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Add Comment

Protected Content