भाजपा दुःशासनाची पार्टी : ममता बॅनर्जी

West Bengal Chief Minister Mamata Banerjee 16b659c8b7b large

कोलकत्ता (वृत्तसंस्था) भाजपा हा असा पक्ष आहे ज्यामध्ये महाभारतातले दुःशासन आहेत. आम्ही भाजपासारखे दुःशासनाची पार्टी नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.

 

ट्वीटरवर ममता बॅनर्जी यांनी एनपीआर, एनआरसी आणि सीएएवरही कठोर शब्दात टीका केली. ममता यांनी म्हटलेय की, भाजपा म्हणजे मुहम्मद तुघलकाचे अपत्य आहे. महाभारत हे एक महाकाव्य आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. या महाकाव्यात दुःशासन हा कौरवांमधला एक राजपुत्र आहे. त्याच्या नावाचा अर्थ होतो वाईट शासन. मोदी सरकार असेच आहे, अशीही टीका ममता बॅनर्जींनी केली आहे.

Protected Content