काँग्रेसच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करणार-संजय ब्राम्हणे

sanjay bramhane 1

जळगाव प्रतिनिधी । काँग्रेसची विचारधारा समाजातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती आज पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस संजय ब्राम्हणे यांनी दिले. आज वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस संजय ब्राम्हणे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. विविध नेत्यांनी त्यांना दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. दरम्यान, वाढदिवसाचे औचित्य साधून प्रस्तुत प्रतिनिधीने ब्राम्हणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काँग्रेसचा विचार हा सर्वसमावेशक असून हाच पक्ष खर्‍या अर्थाने जनताभिमुख आहे. राज्यातील महाआघाडी सरकारमधील महत्वाचा घटक पक्ष म्हणून पक्ष करत असलेले जनहिताचे कार्य जगासमोर आहेच. यासोबत दिन-दुबळ्याचा खरा कैवार हा काँग्रेसनेच घेतलेला आहे. याच विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी प्रयत्नशील असून याबाबत लवकरच एक महत्वाची घोषणा करणार आहे.

मध्यंतरी काँग्रेसी विचारधारा क्षीण झाल्याचा करण्यात आलेला दावा हा खोटा ठरल्याचे अलीकडच्या राजकीय निकालांमधून दिसून आले आहे. देशात काँग्रेसच्या विचारांना पर्याय नसल्याचे आता सर्वांना समजले असून नेमका हाच विचार घेऊन आपण समाजकारण करणार असल्याची माहिती सुध्दा संजय ब्राम्हणे यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content