Home ट्रेंडींग अमेरिकेच्या तळावर इराणचा पुन्हा हल्ला

अमेरिकेच्या तळावर इराणचा पुन्हा हल्ला

0
37

missile

बगदाद वृत्तसंस्था । इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर पुन्हा एकदा हल्ला केल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.

इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर अनेक मिसाइल डागले आहेत. त्यातील चार क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या लष्करी तळांवर पडली आहे. इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेने या हल्ल्यांविरोधात लष्करी कारवाई केल्यास युध्दसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री उशीरा बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाड हवाईतळावर कत्युशा श्रेणीचे आठ रॉकेट सोडण्यात आले होते. यातील चार हे लष्करी तळावर टाकण्यात आले आहेत. अल-बलाड हवाईतळ हे इरकामध्ये अमेरिकी हवाईदलाचे प्रमुख तळ मानले जाते. इराक आपल्या ङ्गएफ-१६फ या लढाऊ विमानांना देखील या ठिकाणीच ठेवतो. या हल्ल्यात अमेरिकी सैन्याला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आळी आहे.

दरम्यान इराण बरोबर तणाव वाढल्यापासून या ठिकाणाहून बहुतांश अमेरिकी सैन्य काढण्यात आलेले आहे. हल्ला करणारे क्षेपणास्त्र नेमके आले कुठून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारल्यापासून आखातात तणाव निर्माण झालेला आहे.


Protected Content

Play sound