अबुधाबी- शुभमान गिलच्या (७०) नाबाद झंझावाती खेळीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्स संघाने अायपीएलमध्ये विजय संपादन केला. या संघाने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ७ गड्यांनी मात केली.
सनरायझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, टीम कर्णधार डेव्हिड वाॅर्नरचा हा निर्णय काहीसा चुकीचा ठरला. सलामीवीर जाॅनी बैयरस्ट्राे (५) स्वस्तात बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर डेव्हिड वाॅर्नर अाणि मनीष पांडेने संघाचा डाव सावरला. मात्र, ३६ धावांची खेळी करून डेव्हिड वाॅर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मनीष पांडे व वृद्धिमान साहाने तडाखेबाज खेळी करताना अर्धशतकी भागीदारी केली.
शुभमान गिलने संघाचा डाव सावरताना झंझावाती अर्धशतक ठाेकले. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना पाच चाैकार अाणि दाेन षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. यासह त्याला यंदाच्या सत्रामध्ये अापल्या नावे पहिल्या अर्धशतकाची नाेंद करता अाली. गत सामन्यात ताे (७) सपशेल अपयशी ठरला हाेता. मात्र, त्याने अाता अापल्या खेळीचा दर्जा उंचावताना दुसऱ्याच सामन्यात दमदार पुनरागमन केले. यामुळे त्याला झंझावाती खेळी सहज करता अाली. यासाठी त्याला इयान माॅर्गनची (४२) माेलाची साथ मिळाली.