राजव्यापी संघटनेत यावल तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महसुल कर्मचारी, ग्रामसेवक पंचायत समिती, शिक्षक संघटना व विज कर्मचारी संघटना यांच्या वतीने जुनी पेन्शन, कंत्राटी पद्धत व विविध मागण्यासाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे. 

यावल येथील तहसील कार्यालयात आज सकाळी सर्व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी संविधान दिनाची शपथ घेवुन जुनी पेन्शन योजना, कंत्राटी पद्धत आणी विविध मागण्यासाठीचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना देण्यात. केन्द्र शासनाच्या विरोधात महसुल कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांच्या वतीने देशव्यापी पातळीवर पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संप करण्यात आले. या संपामुळे महसुल विभागासह इतर संपात ग्रामसेवक संघटना, विज कर्मचारी संघटना, त्याचप्रमाणे शिक्षक संघटनांनी आपला १०० टक्के सहभाग नोंदवला. या महसुल गट (ब) श्रेणीचे ३ कर्मचारी, गट (क) ६१ पैक्की ५४ कर्मचारी व शिपाई ६ अशा ७३ कर्मचारी यांनी या एकदिवसीय संपात सहभाग घेतला. तत्पुर्वी निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार आणि नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले. यावल तालुका ग्रामसेवक संघटनाच्या वतीने तालुका अध्यक्ष रुबाब तडवी, तालुका सचिव पी .व्ही.तळेले,  हितेन्द्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ५० ग्रामसेवकांनी संपात सहभाग घेतला. दरम्यान महसुल व ग्रामसेवक संघटनांनी पुकारलेल्या या संपामुळे महसुल आणी पंचायत समितीचे संपुर्ण काम पुर्णपणे ठप्प झाले होते.

 

Protected Content