मनपातील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत समावेश !

जळगाव प्रतिनिधी । शहर महानगरपालिकेत ९६ रोजंदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यांनी रीट याचिका काढून मनपामध्ये १० मार्च १९९३ पूर्वी नियुक्त केलेले ३९ आणि त्यानंतर नियुक्त केलेले ५७ अशा एकूण ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अखेर मनपाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा नगरविकास विभागाकडे आदेश ८ मे २०१९ रोजी दिला होता. प्रशासनाकडून त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित होता. महापौर जयश्री महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर याबाबत प्रशासनाकडे आणि नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच प्रत्यक्षात भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. महापौरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आज१० रोजी नगरविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Protected Content