मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथे दि २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातभर आपल्या ओजस्वी वाणीतून संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे रामायणकार, युवकांचे प्रेरणास्थान, वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघ उत्तरमहाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, संत मुक्ताई फडावरील युवा कीर्तनकार ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांना प्रभू श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्यातर्फे विशेष निमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे वतिने देण्यात आली.
निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहीती खोले महाराजांनी नुकतीच दिली. भगवान रामचंद्राचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहता येणे हे जीवनातील परम सौभाग्य समजतो अशी प्रतिक्रिया यावेळी खोले महाराजांनी दिली व रामजन्मभूमी न्यासाचे आभार मानले.
देशातील मोजक्याच गणमान्य व्यक्ती व साधूसंताना या कार्यक्रमास बोलावण्यात येणार असतांनाच आदिशक्ती संत मुक्ताईनगर फडाला हे तिसरे आमंत्रण मिळाल्याने मुक्ताई भक्त भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.या आधी संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर व ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांना आमंत्रणे मिळालेली आहेत.