धरणगावात खड्डे देताय अपघातांना आमंत्रण

737a4ddd 17cf 492e 8522 bd3194065904

 

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवरील जुनी नगरपालिका समोरील रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची जणू चाळणीच झाली असून वाहनधारकांना मोठ्या त्रासा सामोरे जावे लागते. दरम्यान, या ठिकाणी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

जुनी नगरपालिका समोरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे जणू अपघातांना निमंत्रणच देताय. जुनी नगरपालिका ते उड्डाण पुलापर्यंतवरील खड्ड्यांना छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. याच रस्त्याने चोपडा शिरपूरमार्गे इंदूर महामार्ग जातो. त्यामुळे वाहनांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे धरणगाव नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी कोणाच्या जीवित हानी होऊ नये, म्हणून रस्ता दुरुस्ती करणे अत्यावश्यक झालेय. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत. दरम्यान, हा रस्ता जवळपास प्रत्येकवर्षी दुरुस्त करण्यात येतो. मात्र, पावसाळ्यात ‘जैसे थे’ स्थिती होऊन जाते. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होते का? असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Protected Content