यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मोहराळे या ग्रामपंचायतीच्या मनमानी व गैरव्यवहारिक ( भ्रष्ठाचार ) कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मोहराळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने यावलचे तहसीलदार व यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे . या संदर्भात मोहराळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,मोहराळे ग्रामपंचायत च्या माध्यमातुन ग्रामसभा न घेता कार्य करीत आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने १५ वित्त आयोग अंतर्गत जो विकास आराखडा तयार करण्यात येत ती गावातील ग्रामस्थांना माहीत नसुन गावातील रस्ते , आदिवासी स्मशानभुमी ( कब्रस्तान ) भुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी असुन देखील तयार करण्यात आलेला नाही, आदिवासी बहुल वस्ती (वाडयात) किंवा दलित वस्तीमध्ये १५ वित्त आयोगाच्या वतीने कोणतिही सुविधा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही . गावात ग्रामपंचायतच्या वतीने कोणकोणती विकासकामे आराख्याड्यातुन होणार आहे हे देखील ग्रामस्थांना माहित नसल्याचे निवेदनात म्हटले असुन , ग्राम पंचायतच्या माध्यमातुन विद्यमान सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार केला असावा असे संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने १५ वित्त आयोगामार्फत विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाचे तपशिलवार माहिती ग्रामस्थांना मिळावी अशी मागणी असंख्य मोहराळे ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे . निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे व गटविकास अधिकारी यांचे तक्रार निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिलेल्या निवेदनावर असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहे .