नाहाटा महाविद्यालयात मानव्य विद्याशाखा अंतर्गत परिचय कार्यक्रम

nahata clg 1

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखे अंतर्गत प्रथम वर्ष कला (FYBA) वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी परिचय कार्यक्रमाचे आयोजन एस.वाय व टी.वाय.बी.ए.च्या विद्यार्थांकडून आज करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एस.पी.झनके, मानव्यविद्या शाखेच्या विविध विभाग मराठी विभाग प्रमुख डॉ.के.के.अहिरे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.रेखा गाजरे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रफुल्ल इंगोले, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.ए.अहिरे, मानसशाख विभाग प्रमुख प्रा.एस.के.राठोड, mentor समितीच्या सदस्या डॉ.स्मिता चौधरी, डॉ.रुपाली चौधरी, प्रा.राजश्री देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर प्रा.डॉ.एस.पी. मनके यांनी mentoring (पालकत्व) याविषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडवणे तसेच उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. जे विद्यार्थी स्लो लर्नर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिकांची सुविधा निर्माण करून मार्गदर्शन करणे, आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे इत्यादी गोष्टींबद्दल सखोल माहिती दिली.

प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.वायकोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांचे  महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणसाठी NSS.NCC स्पोर्ट्स कल्चरल प्रोग्राम महाविद्यालयात सातत्याने राबवले जातात. विविध मंडळाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबर सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. महाविद्यालयात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून एक चांगला नागरिक तयार होवून देशाची सेवा करावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

त्यानंतर SY,TYBA च्या सर्व विद्यार्थ्यांनी FYBA च्या सर्व विद्यार्थ्यांचे पेन आणि चोकलेट देवून स्वागत केले. FYBA च्या विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा परिचय करत एक मिनिटात आपले वेगवेगळ्या विषयावर जसे की मैत्री, राष्ट्रप्रेम, सण उत्सव, भारतीय संस्कृती पर्यावरण अंधश्रद्धा
निर्मुलन इ. विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ.के.के.अहिरे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.रेखा
गाजरे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.व्ही.पी.लढे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र नाडेकर, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.ए.अहिरे मानसशास्त्र प्रमुख प्रा.एस.पी.राठोड यांच्यासह वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.एस.टी.धूम, प्रा.दीपक पाटील, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.डॉ.अनिल हिवाळे इ. उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.समाधान पाटील, प्रा.उज्ज्वला महाजन, प्रा.दीपक शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Protected Content