बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड येथील कला व वणिज्य महावहाविद्यालय बोदवड येथे आज रोजी बोदवड तालुका वकील संघ ,व विधी सेवा प्राधिकरण व न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने अंतरराष्ट्रीय युवादिवस निमित्त कायदेविषयक जागृक्तता निर्माण करण्यासाठी व विविध कायदेविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात खलील विचार ॲड.अर्जुन टी.पाटील अध्यक्ष वकिल संघ तालुका बोदवड यांनी मांडले.
सदर कार्यक्रमाचे सुरवात दिप प्रज्वालाने झाली. जगातील युवकांना जात, धर्म, वंश यावरून भेदभाव न करता युवकांना त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा .व पर्यायाने देश आणि जगाच्या विकासामध्ये युवकांची भुमिका सक्रीय व्हावी. यासाठी संयुक्त राष्ट्र द्वारा 12 अगस्ट 2000 पासुन आंतरराष्ट्रीय युवादिवस साजरा केले जातो. यावेळी त्यांनी लैगिंक अत्याचार , लैगिक छळ,रॅगिंग कायदा ,सायबर कायदा तसेच कारियरच्या वाटा, १ जुलै २०२२४ पासून देशात लागू झालेल्या तीन नवीन कायदे भारतीय न्याय सहिता , भारतीय नागरिक सुरक्षा सहिता , व भारतीय पुरावा कायदा या तिन्ही नवीन कायदे तसेच सोशल मिडिया व इंटरनेट याबाबत ॲड.अर्जुन टी.पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड न्यायालयाचे न्यायाधिश क्यु.एन. शरवरी.प्रमुख मार्गदर्शक ॲड.अर्जुन टी. पाटील अध्यक्ष वकिल संघ तालुका बोदवड.संघाचे सचिव ॲड.धनराज सी प्रजापती.तसेच ॲड .किशोर महाजन ॲड के.एस.इंगळे उप. प्राचार्य व्ही .पी.चौधरी, प्रा.अजय पाटील , यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन प्रा.मनोज निकाळजे यांनी केले. यावेळी न्यायाधिश क्यु.एन. शरवरी. ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.के.एस.इंगळे, यांनीही आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड विधी प्राधिकरण सन्वयक अविनाश राठोड, न्यायालय कर्मचारी प्रशांत बेदरकर, संतोष पाटील ,अविनाश फोफाळे , तसेच कायदा शाखेचे विद्याथी प्रतिक डोळस,संकेत ढोले, फोटो ग्राफर निशांत पवार , दुर्गेश मराठे यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन प्रा. अजय पाटील यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन तरुणवर्ग उपस्थित होते.