यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष यावल मंडळाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या योग शिबिरात नागरिकांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. योग शिक्षक ईश्वर पाटील सर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व, विविध योगासने तसेच त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन पी. एस. सोनवणे सर यांनी केले, तर सहसंयोजक म्हणून भूषण फेगडे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी यावल तालुका खरेदी-विक्री शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन नारायण बापू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका शुभांगी येवले, माजी भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक उमेश फेगडे, दिलीप वाणी, मुकेश कोळी, वीर येवले, पप्पू कासार, संजय फिरके, उज्वल कानडे, पिंटू फेगडे, संजय भोईटे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी योगामुळे शरीर, मन आणि बुद्धीचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष यावल मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



