Home Cities मुक्ताईनगर सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

0
96

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “करा योग, रहा निरोग” हा आरोग्यविषयक संदेश देत सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये ताडासन, पर्वतासन, पवनमुक्तासन, शवासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती यांसारख्या योगप्रकारांचा समावेश होता. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा भारंबे मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास करत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमामुळे विद्यालय परिसरात आरोग्य, उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी नियमित योग करण्याचा संकल्प करत “निरोगी जीवनासाठी योग हीच गुरुकिल्ली” असा संदेश दिला.


Protected Content

Play sound