Home Cities जळगाव गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मिडवाईफ डे उत्साहात संपन्न!

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मिडवाईफ डे उत्साहात संपन्न!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय मिडवाईफ डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रसूतीनंतर माता आणि बालकांची काळजी घेणाऱ्या परिचारिकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला आदराने गौरविण्यात आले.

दरवर्षी ५ मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मिडवाईफ (सुईणी) दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाने ‘मिडवाईफ (सुईणी): प्रत्येक संकटात गंभीर’ या विषयावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुईणींच्या कार्याचे महत्त्व विशद करण्यात आले. अनेकदा आरोग्यसेवेची उपलब्धता नसलेल्या माता किंवा वेळेपूर्वी जन्मलेल्या बालकांच्या कठ…


Protected Content

Play sound