जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या सप्ताहात महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण, जलदौड रॅली, पोस्टर सादरीकरन स्पर्धा, जैवविविधतेचे संवर्धन या सहित विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरवर्षी, 22 मे रोजी जैवविविधतेच्या समस्यांबद्दल जागरूकता आणि संकल्पना समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या दिवसाचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना जैविक विविधतेचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीच्या परिसंस्थांवर कसा परिणाम होतो याची आठवण करून देणे हा आहे.
सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सांगितले की, “जैवविविधतेने समृद्ध, शाश्वत आणि आर्थिक क्रियाकलापांसाठी संधी देणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. जैवविविधतेच्या कमतरतेमुळे पूर, दुष्काळ, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिकच वाढतो, त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर लाखो अद्वितीय जैविक प्रजातींच्या अनेक रूपात जीव अस्तित्वात आहे आणि आपले जीवन ही निसर्गाची एक अनोखी देणगी आहे. त्यामुळे निसर्गाच्या देणग्या, झाडे, वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी, माती, हवा, पाणी, महासागर, महासागर नद्या यांचे आपण संरक्षण केले पाहिजे.” असे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच यावेळी काही उपस्थित विध्यार्थ्यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्व सांगत प्रतिज्ञा घेतली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. राहुल यादव व नैना चौधरी यांनी केले; तर आभार प्रा. गुंजन चौधरी यानी मांडले. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संदीप पाटील, प्रा.शीतल किनगे, प्रा.प्रियंका मल, प्रा.गायत्री भोईटे, मुकेश सदनशिव, मीनाक्षी पाटील, अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले. या सप्ताहाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.