कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह : २५ आमदारांनी थेट सोनियांना लिहले पत्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांवर तपास यंत्रणांची वक्रदृष्टी वळलेली असतांना आता कॉंग्रेसच्या २५ आमदारांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचे मंत्री आपले ऐकत नसल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

द इकॉनॉमीक टाईम्स या वर्तमानपत्राने दिलेली एक बातमी ही राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे. या वृत्तानुसार कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह आता थेट दिल्ली दरबारात पोहचला आहे.या वृत्तानुसार, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे काही मंत्री त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आल्याचा दावा संबंधीत वृत्तात करण्यात आलेला आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, आमच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मतदारसंघात विकासकामे करायची आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या विनंतीकडे मंत्री दुर्लक्ष करत असल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल, असे संबंधित आमदारांचे म्हणणे आहे. स्वाभाविकच पक्षाच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पक्षाकडूनच आपले आमदार आणि नेत्यांच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष झाले तर, निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Protected Content