अनोरे ग्रामस्थांच्या मदतीसाठी उत्स्फूर्तपणे महाश्रमदान

f6d6143c a26d 45e7 a9a4 61c463d3bfee

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथे आज (१ मे) दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी महाश्रमदान करण्यात आले. अमळनेर शहरासह परिसरातील गावांच्या ग्रामस्थांनी, युवक-युवतींनी, सामाजिक संघटनांसह सोशल मीडिया ग्रुपनेही यावेळी उत्स्फुर्तपणे श्रमदान केले. गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत जिद्दीने उतरलेल्या अनोरेवासीयांच्या प्रयत्नांना येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने विशेष पुढाकार घेवून या कार्यात मदत केली आहे.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून अनोरे गावामध्ये दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सुटीचा दिवस सार्थकी लावण्याच्या उद्देशाने आणि गावकऱ्यांचे पाणीदार स्वप्न पूर्ण करण्याचा हेतूने शेकडो नागरिक महाश्रमदानामध्ये सहभागी झाले होते.

 

महाश्रमदानासाठीचे नियोजन पाणी फाउंडेशन व सक्रिय ग्रामिण कार्यकर्त्यांच्यावतीने आधीच करण्यात आले होते. त्यानुसार आज पहाटेपासून उत्स्फूर्तपणे अनोरे, आर्डी, जवखेडे येथील ग्रामस्थांनी हजेरी लावली. आ.शिरीष चौधरी यांनीही कार्यकर्त्यांसह सहभाग घेत गावकऱ्यांचा उत्साह वाढवला. अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष डिगंबर महाले, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त सौ. जयश्री साबे यांच्यासह मंगळदेव ग्रह मंदिरातील ६० सेवेकरीसह महाश्रमदानात सहभागी झाले होते. त्यांच्या आगळ्या-वेगळ्या गणवेशामुळे ते एकुणच कार्यक्रमात उठून दिसत होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेने आनोरे हे गाव दत्तक घेतले आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी, बाळू कोठारी व सदस्य,खा.शि .मंडळ संचालक योगेश मुंदडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, माझं गांव माझं अमळनेर व्हाट्सअप ग्रुपचे सुनिल भामरे, सोमचंद संदानशिव, मनोज शिंगाने, कुणाल साळी, अॅडव्होकेट दिनेश पाटील, विजय पाटील यांच्यासह सदस्यांनी मोठ्या संख्येने श्रमदान केले. तसेच गावातील तरुण तरुणींसह बालिका कु.शैलजित शिंदे हिनेही हिररीने श्रमदान केले. माजी सभापती श्याम अहिरे, नगरसेवक बबली पाठक, किरण गोसावी यांचेसह स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम नथु पाटील, बाजीराव पाटील, यांनीही ग्रामस्थांसह श्रमदान केले.

पाणी फाउंडेशनचे टेक्निकल मास्टर ट्रेनर श्रीकांत सहस्रबुद्धे, टेक्निकल ट्रेनर सोनल नेहे, सोशल ट्रेनर शारदा वाळके, जि. प.सदस्य संदीप पाटिल यांनी महाश्रमदानात नियोजनानुसार कार्य पार पाडण्यासाठी विशेष लक्ष घातले. महाश्रमदानासाठी ‘आम्ही येतोय… तुम्ही देखील या!’ असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावांमध्ये पाणी संवर्धनाच्या कार्यात अनेकांनी सहभाग नोंदवला. अनेक सामाजिक संस्थांनीही यात सहभाग घेत महाश्रमदानात हातभार लावला. मंगळ ग्रह मंदिर संस्थांनतर्फे श्रमकरी तथा जलमित्रांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Add Comment

Protected Content