रावेर शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेर प्रतिनिधी । शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्राची जळगावच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून कोरोनाच्या उपाय योजनांसदर्भात पालिकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशावरुन आज जिल्हा परिषदचे वरीष्ठ अधिकारी महिला बाल कल्याणचे आर.आर. तडवी यांनी रावेर शहरातील महालक्ष्मी नगर मध्ये एका कुटुंबाची प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन माहीती घेतली. तर रावेरात अप्पू गल्लीमध्ये देखील भेट देत त्यांनी तिथे देखील होम कॉरंटाईन असलेल्या व्यक्तीशी संवाद साधत पालिकेच्या कामावर समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी, बांधकाम अभियंता जावेद शेख, हबीब तडवी आदी उपस्थित होते.

Protected Content