पातोंडा ता.अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी आजादी गौरव पदयात्रेच्या दौरा निमित्ताने पातोंडा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन नुकताच पातोंडा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणीदेखील केली.
सोबत शिक्षक आमदार सुधीर तांबे, माजी खासदार उल्हास पाटील यांची देखील यावेळी उपस्थिती होती. गावात पदयात्रा काढून पातोंडा विविध कार्यकारी सोसायटीत बाळासाहेब थोरात यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन सुनिल पवार यांनी केला. सुधीर तांबे यांचा सत्कार अमित पवार यांनी तर उल्हास पाटील यांचा सत्कार ग्रा.पं.सदस्य संदिप पवार यांनी केला. सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पातोंडा मंडळात शेती शिवारात १०० मिमी च्या वर झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसा भरपाईच्या मागणीचे व शिवारातील शेतात दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने पाटचारीचे पाणी नेहमी साचत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी मठगव्हाण रोडवरील सुटवा नाला, पाटचारी व पावसाच्या पाण्याने भरलेल्या शेतांची पाहणी केली. यावेळी खरीप हंगामातील कापूस, मुग, उडीद, मका, सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे सडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुजून टाकलेली पाटचारी कोरून व सुटवा नाल्याचे कायमस्वरूपी पाण्याचा निचरा होईल किंवा नाला खोलीकरण व पाटचारी खोदून शेताच्या दोन्ही बाजूंनी पाणी बाहेर काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे तसेच ही समस्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडून राज्य शासनाकडून कार्यवाही करण्याची मागणी उपस्थित अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांनी केली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत तात्काळ मिळवून द्यावी असे शेतकऱ्यांनी सांगितले. या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन थोरात यांनी दिले.
यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक बी. के.सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील, ग्रा.पं. सदस्य संदिपराव पवार, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या रिता बाविस्कर, सोसायटीचे व्हा. चेअरमन जगन्नाथ सोनवणे, संचालक राहुल पवार, राहुल लांबोळे, नेहरू पवार, अजतराव सुर्यवंशी, विनोद पवार,मंगेश पवार, स्वप्निल पवार,प्रशांत खैरनार ,भानुदास चौधरी, मेघराज सूर्यवंशी, अशोक पवार, प्रवीण लाड, ज्ञानेश्वर सोनवणे, नंदलाल चौधरी, राजेंद्र यादव, प्रकाश लांबोळे, भावलाल पाटील,संजय पवार ,राजेंद्र वाणी, वाल्मीक पवार, विजय पवार, प्रवीण पाटील, पंकज पवार यासह सोसायटी कर्मचारी नरेंद्र यादव, अनिल पवार,अमोल चौधरी,भिकन पाटील सचिव राजेंद्र वाणी यांचे सहकार्य लाभले तसेच परिसरातील शेतकरी, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.