ब्रेकींग : मंत्री नवाब मलीक ईडीच्या ताब्यात ; कसून चौकशी

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज पहाटेच सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरावर आज पहाटे सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. १९९३ च्या बॉंम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याची शक्यता आहे.

Protected Content