बिलवाडी येथील उपक्रमशील शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 07 08 at 7.07.33 PM

जळगाव (प्रतिनिधी ) : उपक्रमशील शिक्षकास अतिरिक्त ठरवून बदली केल्याने त्यांची बदली रद्द करण्यासाठी बिलवाडी येथील पदाधिकारी व पालकांनी थेट जिल्हा परिषद येथे धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी केली.

बिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले संदीप पाटील यांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात आली आहे. पालकांनी शनिवारी शाळेत आंदोलन करत प्रशासनावर रोष व्यक्त केला होता. आज शाळेत पूर्ण पटसंख्या असतांना उपक्रमशील शिक्षकाला अतिरिक्त ठरवत केलेली बदली तात्काळ रद्द करण्यासाठी बिलवाडी येथील पदाधिकारी व पालकांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन संदीप पाटील यांची बदली रद्द करा अशी मागणी केली. यावेळी निवेदन देतांना जि.प.सदस्य पवन सोनवणे,जळगाव पं.स.चे माजी उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य धोंडूभाऊ जगताप,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गोपाळ,त्र्यंबक उमरे,समाधान पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामकृष्ण मराठे,विलास मराठे,सुरेश वाघ,धनराज गोपाळ,गोपाल पाटील,दिनोद पाटील,चर्मकार महासंघाचे ज्ञानेश्वर वाढे,कैलास पाटील,गोविंदा ठाकरे,प्रेमराज भिल,भरत पाटील,रवींद्र जगताप,आप्पा भिल,शरद पाटील,नाना भिल,दिलीप सोनवणे,अशोक सोनवणे,गोविंदा गायकवाड,रमेश पाटील व पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. बिलवाडी येथे इयत्ता १ली ते ५वी ची पटसंख्या १२१ असून ५ शिक्षक पदे मान्य आहेत. मात्र , संदिप पाटील यांना २०१८ च्या संचमान्यतेवर अतिरिक्त ठरवून बदली केल्यामुळे आज शाळेत ४ च शिक्षक राहत असून एक वर्ग वाऱ्यावर गेला आहे व त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.आज रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून पूर्ण पटसंख्या असल्याने मागील वर्षाच्या संचमान्यतेवर त्यांची झालेली बदली रद्द करावी यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा आज रोजी शाळेत पूर्ण पटसंख्या असल्याने योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. संदिप पाटील हे विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक असून उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गावात डिजिटल शाळा करणे,सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे,दरवर्षी पटसंख्या वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.त्यामुळे त्यांच्या या बदलीने सर्व विद्यार्थी,पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बदली रद्द न झाल्यास पालकांनी आपले विद्यार्थी दुसऱ्या शाळेत दाखल करुन,शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.

 

Protected Content