चोपडा येथे वाहनधारकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

2d03c999 ecf0 4e52 901d 0c76df9e8e3f

चोपडा, प्रतिनिधी | शिरपूर-चोपडा हायवेवर चहार्डी फाट्याजवळ आदिवासी लोकांच्या मोटार सायकली अडवुन आपण पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्याकडून कागदपञांची तपासणी करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या ठगाला येथील शहर पोलिसांनी काल (दि.७) अटक केली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, हा तोतया पोलीस अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात फिरत होता, पोलिसांना सुगावाही मिळाला होता. त्या अनुषंगाने शहर पोलिसांची सगळीकडे करडी नजर होती. शेवटी काल त्याला अटक करण्यात यश आले. हा ठग पारोळा येथिल भिकन पंडित शर्मा असून तो होमगार्ड दलात काम करीत असताना त्याच्यावर पारोळा पोलिस स्टेशनला २००९ मध्ये गुन्हा दाखल आहे. तो आधी आचाऱ्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. होमगार्ड दलात काम करीत असताना त्याच्या अगांवर होमगार्डचा खाकी पेहराव असायचा तेव्हापासून त्याच्या डोक्यात खाकी गणवेशाची गुर्मी शिरली होती. त्याने गणवेशाचा गैरफायदा घेऊन दि.४ व ७ जुलै रोजी शिरपुर-चोपडा हायवेवर व चहार्डी फाट्यावर आदिवासी लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या मोटार सायकली थांबवुन पोलीस असल्याचे बतावणी करीत त्यांच्याकडे कागदपञांची तपासणी करण्याच्या बहाण्याने पैशाची वसुली चालवली होती.

याबाबत होमगार्ड दलात कार्यरत असलेले संदीप लक्ष्मण सोनवणे यांनी पो.ना. प्रदीप हिम्मत राजपुत यांना मोबाईलवरुन दि.४ जुलै रोजी दुपारी याबाबत माहिती दिली होती. माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रदिप राजपुत व पो.काँ. नितिन कापडणे असे दोघे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता तेथुन त्याने पळ काढल्याने तो त्यांना आढळून आला नव्हता. तो पून्हा दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास त्याच जागेवर वाहनांना थांबवुन तपासणीचा नावाखाली पैशांची मागणी करीत असताना होमगार्ड संदिप सोनवणे रा.गलवाडे यांना दिसला असता त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पो.ना. प्रदीप राजपुत व पो.ना. ज्ञानेश्वर जगावे दोघांनी घटनास्थळी जावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पँनकार्ड, आधारकार्ड, लायसन्स व युनिफार्म असलेले फोटो मिळुन आले असुन त्याच्या ताब्यातील प्लाटीना मोटार सायकल (क्र.५६९२) जप्त करण्यात आली आहे. पो.ना.प्रदीप राजपुत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात त्याच्याविरुध्द भादवि कलम १७०,४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मधुकर पवार करीत आहेत.

Protected Content