जळगावात नागरिकांचा स्व:खर्चाने खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 08 05 at 12.48.41 PM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा दौऱ्यावर असून महापालिकेवर भाजपाची सत्ता असतांना नागरिक स्व: खर्चाने स्व:ताचा त्रास कमी व्हावा यासाठी रस्ता दुरुस्त करत असल्याचा प्रकार घडला. महापालिका मुलभूत सुविधा देखील नागरिकांना पुरवू शकत नसल्याने नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

शहरातील राधाकृष्णवाडी गायत्री माता मंदिरा समोरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. परिसरातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर जवळपास ३० खड्डे असल्याची माहिती रहिवाश्यांनी दिली. मनपाकडून या रस्त्याची साधी डागडूजी करण्यात न आल्याने येथील रहिवाशी स्व:खर्चानेच रस्त्यावरील खड्डे बुजवित आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा अपघात होऊ नये यासाठी भगवतलाल मुंदडा स्वखर्चाने सिमेंट टाकून हे खड्डे बुजवित आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी त्यांचे १०-१५ कर्मचारी काम करीत आहेत.

Protected Content