अखंड भारताचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणारा ऐतिहासिक निर्णय – खा.उन्मेश पाटील

unmesh patil

चाळीसगाव प्रतिनिधी । अखंड भारताचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणारा ऐतिहासिक निर्णय म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरमधील 370 कलम जवळपास रद्द करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होता आले, असे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम अश्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरमधील 370 कलम जवळपास रद्द करून जम्मू काश्मीर आणि लद्दाख असे २ केंद्र शासित प्रदेश निर्माण करण्याची ऐतिहासिक घोषणा केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार होता आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले, हे मी माझे भाग्य समजतो, एक देश, एक निशाण, एक संविधान हा अखंड भारताचा संकल्प आज पूर्ण झाला असून खऱ्या अर्थाने डॉ. हेडगेवार, श्रीगुरूजी, स्वा.सावरकर, शामाप्रसाद मुखर्जींचा आत्मा आज सुखावला असेल. रक्त, अश्रु, घामाने भाजपला सत्तासोपानापर्यंत नेणाऱ्‍या लाखो कार्यकर्त्यांच्या श्रमाचे चीज झाले. मोदींजींच्या संकल्पनेतून नवीन भारत घडवीत असताना नवीन काश्मीर देखील घडवायचा आहे. काश्मीरी बांधवांना उर्वरीत भारतापासून तोडणारे कलम ३७० संविधानातून हटवल्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन करत असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

Protected Content